Congress : कर्नाटकचा विजय कॉंग्रेसला ठरणार डोकेदुखी? 

काँग्रेस हायकमांड ज्याच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालेल, त्यानंतर कर्नाटकातही मध्य प्रदेश घडणार नाही, याची शास्वती कोण देऊ शकणार? 

235

अवघ्या चार महिन्यात दुस-या राज्यात सरकार बनविण्यात यश आल्यामुळे कॉंग्रेसचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. कॉंग्रेसच्या मुख्यालयात मिठाई वाटून हा आंनद साजरा करण्यात आला. 24 अकबर रोडवरील कॉंग्रेसच्या मुख्यालयात शनिवार, १३ मे रोजी उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसच्या हातात राज्याची धुरा दिली. याचा आनंद मुख्यालयात साजरा करण्यात आला. सकाळी अकरा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी  फटाके फोडायला सुरुवात केली होती. मिठाई वाटली गेली आणि ढोल ताशे वाजविण्यात आले. पण काँग्रेससाठी हा विजय डोकेदुखी ठरणार का, हे पाहावे लागेल.

मागील नऊ वर्षांपासून सातत्याने पराभवाचे तोंड बघावे लागत असतानाच 2023 या वर्षाने कॉंग्रेसला दोन दोन राज्यांची सत्ता दिली. वर्षाच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशमध्ये सरकार स्थापन केले आणि आता कर्नाटकातही जनतेने कौल दिला. यामुळे कॉंग्रेसच्या मुख्यालयात जी मळमळ दिसून येत होती ती या दोन राज्यांच्या विजयामुळे दूर झाली, असे म्हणावे लागेल.

(हेही वाचा Karnataka Assembly election : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदरी निराशा)

मात्र कर्नाटकातील विजय काँग्रेसला खरच तितकासा पचवता येणार आहे का? कारण मध्य प्रदेशातही काँग्रेसचे सरकार आले होते, मात्र तिथे मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ आणि ज्योतिराधित्य सिंधिया हे दोघे जण दावे करत होते, काँग्रेस हायकमांडने कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवले आणि नाराज सिंधिया यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपचा रस्ता पकडला, ज्याचा परिणाम म्हणून तिथे सरकार कोसळले आणि भाजपचे सरकार आले. कर्नाटकात निकालाच्या दिवशीच मुख्यमंत्री पदासाठी तीन तीन जणांनी दावे सांगितले आहेत. एका बाजूला सिद्धरामैय्या, तर दुसऱ्या बाजूला शिव कुमार आणि तिसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे यांनी दावा केला आहे. अशा वेळी एकाच नावाचा विचार करताना हायकमांड ज्याच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालेल, त्यानंतर कर्नाटकातही मध्य प्रदेश घडणार नाही, याची शास्वती कोण देऊ शकणार?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.