Sudhir Mungantiwar : पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच – सुधीर मुनगंटीवार

पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता.

198
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar : पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच - सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी आरोप – प्रत्यारोपाचे सत्र सुरु केले आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; पोलिसांत तक्रार दाखल)

एका मुलाखतीत मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला.

हेही पहा – 

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकास सोडून ते स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला होता. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.