ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भाजप, शिंदे गटावर सडकून टीका करतात. पण याच टीकेवर सडेतोड प्रत्युत्तर देण्याची एकही संधी भाजप आमदार नितेश राणे सोडत नाहीत. रविवारी, १४मेला सकाळी राऊतांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये ते १६ आमदारांच्या अपत्रातेवरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच विधानसभा अध्यक्षांना त्यांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. पण याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन पुढील तीन महिन्यांत राऊत पुन्हा एकदा तुरुंगात जातील, असा खळबळजनक दावा केला. त्यासोबत त्यांनी नाना पटोलेंच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत मित्रपक्षांना सांगण्याची जबाबदारी संजय राऊतांवर होती, असं देखील सांगितलं.
(हेही वाचा – Nitesh Rane : संजय राऊत येत्या तीन महिन्यात तुरुंगात जाणार – नितेश राणे)
त्यावेळी नेमकं काय घडलं?
नितेश राणे म्हणाले की, ‘तुझ्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलंय. जेव्हा नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांनी मित्रपक्षाला अवगत केलं होत, हे ते सांगतायत. हे सत्य आहे. कारण नाना पटोलेंनी दिल्लीमध्ये संजय राऊतांना ती जबाबदारी दिली होती. माझ्या राजीनाम्याबद्दल मित्रपक्षाला कळवा, ही जबाबदारी संजय राऊतांना दिली होती. त्यामुळे आता संजय राऊतांनी उत्तर दिलं पाहिजेत. तुम्हाला माहिती होत की, नाना पटोले राजीनामा देणार आहेत, मग मित्रपक्षांना का कळवंल नाही. स्वतःच्या मालकाला का कळवलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना का कळवलं नाही. याचे उत्तर संजय राऊतांनी द्यावे. महाविकास सरकार पाडण्याचे आमच्यावर आरोप करतात, आणि असं बोलतात की, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार पडलं नसतं. याला प्रमुख जबाबदार संजय राऊत आहे. यालाच सरकार पाडायचं होत.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community