Drugs : केरळमधून १२ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; पाकिस्तानी तस्कराला अटक

पकडलेली बोट आणि मुख्य जहाजातून जप्त केलेल्या काही इतर वस्तू शनिवार १३ मे रोजी कोचीन येथील मत्तनचेरी जेट्टी येथे आणण्यात आल्या

296
Drugs
Drugs : केरळमधून १२ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; पाकिस्तानी तस्कराला अटक

केरळच्या कोच्चीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त कारवाईत १२ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त (Drugs) करण्यात आले आहेत. यावेळी मॅथॅम्फेटामाईन नावाचे ड्रग्ज देखील आढळून आले आहे. भारतात पहिल्यांदाच या अंमली पदार्थाची इतकी मोठी खेप पकडण्यात आली आहे. याप्रकरणी एका पाकिस्तानी तस्कराला अटक करण्यात आली असून त्याने हा माल अफगाणीस्तानातून समुद्रमार्गे केरळमध्ये आणल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कारवाईत सुमारे ३२०० किलो मेथॅम्फेटामाइन, ५०० किलो हेरॉईन (Drugs) आणि ५२९ किलो चरस जप्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.एनसीबी टीमने डीआरआय, एटीएस गुजरात इत्यादी संस्था आणि भारतीय नौदलाची गुप्तचर शाखा, एनटीआरओ इत्यादी गुप्तचर संस्थांशी संवाद साधला आणि माहिती गोळा केली. भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून मकरनच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मेथॅम्फेटामाइन घेऊन जाणाऱ्या ‘मदर शिप’च्या हालचालीबाबत माहिती मिळाली. (Drugs)

(हेही वाचा – Akola Violence: अकोला मध्ये दोन गटांत हाणामारी; कलम १४४ लागू)

मदर शिप या मोठ्या जहाजाच्या मदतीने समुद्रात अंमली पदार्थ (Drugs) इतर जहाजांवर वितरीत होतात. या मदर शिपवर कारवाई करण्यासाठी आसपासच्या परिसरात भारतीय नौदलाचे जहाज तैनात करण्यात आले होते. यावेळी नौदलाने समुद्रात जाणारे एक मोठे जहाज (Drugs) अडवले. त्या जहाजातून संशयित मेथॅम्फेटामाइनची १३४ पोती जप्त करण्यात आली असून एका इराणी नागरिकालाही ताब्यात घेण्यात यश आले आहे.

हेही पहा – 

थांबलेल्या स्पीड बोटमध्ये एक व्यक्ती होता जो पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय आहे. जप्त केलेल्या गोण्या, पाकिस्तानी नागरिक, पकडलेली बोट आणि मुख्य जहाजातून जप्त (Drugs) केलेल्या काही इतर वस्तू शनिवार १३ मे रोजी कोचीन येथील मत्तनचेरी जेट्टी येथे आणण्यात आल्या आणि पुढील कारवाईसाठी एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.