नक्की ३२ हजार महिला बेपत्ता? अहवालच देतोय उत्तर…

671
नक्की ३२ हजार महिला बेपत्ता? अहवालच देतोय उत्तर...
नक्की ३२ हजार महिला बेपत्ता? अहवालच देतोय उत्तर...

– नित्यानंद भिसे

द केरळ स्टोरी पाहिल्यावर समर्थ रामदास स्वामींनी अनेक शतकांपूर्वी याविषयी सजग केले होते, याचा प्रत्यय येतो. त्यावेळी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवले आहे, स्वामी म्हणतात …

किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या।
किती शांमुखी जाहाजी फाकवील्या।
कितीयेक देशांतरी त्या विकील्या।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।।

सलमानी आक्रमणकर्त्यांनी केलेल्या अत्याचाराची समर्थांनी अत्यंत योग्य शब्दांत मांडणी केली. पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्या सारख्या शूरांनी मुसलमान आक्रमणकर्त्यांचा हेतू साध्य होऊ दिला नाही, पण ‘द केरळ स्टोरी’ पाहिल्यावर मुसलमान आक्रमणकर्ते अजूनही जिवंत आहेत, याची साक्ष मिळते. या चित्रपटात शालिनी, गीतांजली आणि निमा या तीन मुलींना धर्मांतर करण्यासाठी ज्या आसिफासोबत दोन मुसलमान तरुणांना त्यांचा म्होरक्या धर्मांध मुसलमान सांगतो, जे काम अकबर, औरंगजेबने अपूर्ण ठेवले आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे, सर्वत्र इस्लामिक स्टेट निर्माण करायचे आहे. त्यावरून हा अजेंडा आताच नाही, अनेक दशकांपासूनचा आहे. ज्याच्या विरोधात त्या-त्या वेळी हिंदू राजांनी प्राणाची पर्वा न करता त्याचा विरोध केला आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. प्रश्न आता २१व्या शतकाचा आहे. आजही समर्थ रामदास स्वामींची वरील शब्दरचना आठवत आहे.

(हेही वाचा – The Kerala Story : ‘अल्लाह-हू-अकबर, नारा-ए-तकबीर’ घोषणा देत फाडले ‘द केरळ स्टोरी’चे पोस्टर)

आकड्याच्या माध्यमातून होते दिशाभूल

अशा परिस्थितीत जर हिंदूंमध्ये जागृती करणारा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा त्या चित्रपटातील ३२ हजार मुली गायब आहेत, असे शालिनी संयुक्त राष्ट्र संघाच्या कोठडीत चौकशीत बोलताना सांगते. त्याचे भांडवल केले जात आहे.

हा आकडा नक्की कुठून आला, अशी विचारणा होत आहे, हे दुर्दैवी आहे. या चित्रपटाला जाणीवपूर्वक विरोध करणाऱ्यांनी या मुद्याचे भांडवल करत ‘जर हा आकडा चुकीचा आहे, तर या चित्रपटाची कथाचा खोटी आहे, मुसलमान धर्माची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे’, असा आरोप सुरु झाले आहेत. त्यामुळे आता हा आकडा नक्की कुठून आला यावर चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक महिला गायब झाल्या आहे, ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता काम नये. जरी ३२ हजार केरळातील आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो यांच्या अहवालातून येतो.

‘एनसीआरबी’च्या अहवालात २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांत १ लाख ७४ हजार २१ महिला बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.

राज्य                २०१६         २०१७          २०१८
महाराष्ट्रात          २८,३१६      २४,९३७      ३३,९६४
प. बंगाल           ३४,९३७     २८,१३३       ३१,२९९
मध्य प्रदेश          २१,४३२      २६,५८७     २९,७६१
दिल्ली               १२,०६७      १२,२०२      १३,२७२
तामिळनाडू          ९,५९६       १२,२०२      १३,२७२
तेलंगणा              ९,२३८        ९,५६४      १०,४०३
केरळ                ४,९२६        ६,०७६       ७,८३९

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.