पिझ्झा हा पदार्थ अनेकांना आवडतो. इटलीतून आलेला हा पदार्थ जगात सर्वांचाच आवडता झाला आहे. आता तर काही सोहळ्यातही पिझ्झा दिला जातो. पिझ्झा जरी महाग असला तरी तुम्ही कल्पना करू शकता का की एका पिझ्झाची किंमत १.६० लाख असेल तर? वाचून धक्का बसला ना? पण हा पिझ्झा खरोखर उपलब्ध आहे.
Brooke Baevsky या प्रसिद्ध शेफने एका सेलिब्रिटीसाठी एक पिझ्झा बनवला आणि या पिझ्झाचा व्हिडिओ शेअर केला असून या पिझ्झाची किंमत आहे २००० डॉलर म्हणजेच १.६० लाख रुपये. मात्र हा पिझ्झा लोकांना मुळीच आवडला नाही. लोकांनी म्हटलं की हा पिझ्झा भयानक आहे. तर काहींनी म्हटलं की, तुम्ही काहीही बनवू शकत नाही. अशा प्रकारचे कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.
(हेही वाचा – Heat Wave : वाढत्या उष्णतेचे होतायेत नकारात्मक परिणाम; कोणते आजार वाढले?)
आता पाहूया ब्रूकने नेमकं या पिझ्झामध्ये काय काय घातलं आहे. ऑर्गनिक अंजिर, मशरुम पावडर, बदाम, ग्लूटन फ्री पिठाचे मिश्रण, पाणी, तेल इत्यादी साहित्यापासून हा पिझ्झा तयार करण्यात आला आहे. ब्रूकने या पिझ्झाची संपूर्ण रेसिपी एका व्हिडिओद्वारे सामायिक केली आहे.
पहा हा व्हिडिओ:
View this post on Instagram
अनेकांना ही रेसिपी मुळीच आवडली नाही. पण हा १.६० लाखांचा पिझ्झा तुम्हाला कसा वाटला?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community