अकोल्यात शनिवारी, १३ मे रोजी मध्यरात्री हरिपेठ भागात समाजमाध्यमावरील एका पोस्टवरुन दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर दंगलीत उसळले. यावेळी जाळपोळ आणि रस्त्यांवरील वाहनांची मोठ्याप्रमाणात तोडफोड झाली. तसेच पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान शहरात १४४ कलम लागू करण्यात आले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. माहितीनुसार, या घटनास्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी जाण्याची शक्यता आहे.
एका व्यक्तीच्या समाजमाध्यमावरील पोस्टमुळे अकोल्यात हा वाद उद्भवला. विशिष्ठ समुदायाच्या दंगलखोरांनी शनिवारी रात्री अकोला शहराच्या रस्त्यावरील वाहने पेटवली. अग्निशमन दलाच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता शहरात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच अफावा पसरू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिवाय बाजारपेठेतील दुकाने आणि पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. पण आता आठवड्याची सुरुवात असल्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार कधी सुरळीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – The Kerala Story Movie Review: हिंदूंना अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट!)
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४५ आरोपींना अटक केली आहे. पण माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी फरार झाला आहे, सध्या त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी अकोल्यात जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजप नेते गिरीश महाजनांनी या घटनास्थळी भेट दिली आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community