कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजपा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातली सत्ता वाचवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येत, असल्याचे म्हटले जात आहे. १७ आणि १८ मेला जे.पी. नड्डा महाराष्ट्रात असून ते यावेळी राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका घेऊन पक्षाच्या स्थिती संदर्भात आढावा घेणार आहेत.
येत्या नजीकच्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विविध महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका यासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – मुंबईत पाच ठिकाणी उभारणार धूळ नियंत्रण केंद्र; साडेदहा कोटींचा खर्च)
मुंबईसह राज्यातील पक्ष संघटनेची घेणार माहिती
भाजपा करिता मुंबई महापालिका अत्यंत प्रतिष्ठेची असल्याकारणाने मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दौऱ्यात महाराष्ट्र भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबरच मुंबईच्या नेत्यांबरोबरही महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community