कोलकताने चेपॉक मैदानावर धोनीच्या चेन्नईचा पराभव करत गुणतालिकेत मोठा बदल केला. कोलकाताने चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला. मोक्याच्या क्षणी कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांनी 99 धावांची भागिदारी करत कोलकाताला सहज विजय मिळवून दिला. या विजयामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान जिंवत राहिले, तर चेन्नईचे प्लेऑफमधील आव्हान खडतर झाले. चेन्नईच्या पराभवाचा फायदा मुंबईला झाला आहे.
चेन्नईचे कसे आहे समीकरण?
चेन्नईने 13 सामन्यात 15 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईने सात सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना अनिर्णित राहिला. चेन्नईचा अखेरचा सामना दिल्लीबरोबर आहे. हा सामना चेन्नईला जिंकणे अनिवार्य आहे. चेन्नईने दिल्लीचा पराभव केल्यास त्यांचे 17 गुण होतील.. ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. पण जर चेन्नईला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.
(हेही वाचा Rahul Narvekar : आमदारांच्या अपात्रतेवर कधी निर्णय घेणार; विधानसभा अध्यक्षांनी सविस्तर सांगितले)
मुंबईला कसा फायदा झाला?
मुंबई सध्या 12 सामन्यात 14 गुण आहेत. मुंबईचे आणखी दोन सामने बाकी आहेत. मुंबईने उर्वरित दोन्ही सामने जिंकून 18 गुणांपर्यंत मजल मारता येईल. यासह मुंबईला आघाडीच्या दोन स्थानापर्यंत पोहचता येईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिल्यास संघाला एक अतिरिक्त संधी मिळेल. मुंबईचे उर्वरित सामने हैदराबाद आणि लखनौ संघासोबत आहे. या दोन्ही सामन्यात मुंबईने बाजी मारल्यास मुंबई क्वालिफायर एक साठी पात्र होईल. चेन्नईने कोलकात्याचा पराभव करुन दिल्लीविरोधातील सामनाही जिंकला असता तर मुंबईला टॉप 2 मध्ये प्रवेश करता आला नसता.. त्यामुळे चेन्नईच्या पराभवाचा फायदा मुंबईला झाला.
मुंबईने दोन्ही सामने गमावले तर..
मुंबई इंडियन्सला उर्वरित एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही तर पाच वेळच्या विजेत्याचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल. मुंबई इंडियन्सचे फक्त 14 गुण होतील.. अशात नेटरनरेट मोठी भूमिका बजावू शकते. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही मुंबईचे प्लेऑफमधील स्थान ठरू शकते.
Join Our WhatsApp Community