Karnataka Election 2023 : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? लवकरच निर्णय होणार

मल्लिकार्जुन खर्गे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत.

165
Karnataka Election 2023 : कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी कोण होणार विराजमान? लवकरच निर्णय होणार

कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला. यामध्ये भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं असलं तरीही मुख्यमंत्री पदी कोणाची नेमणूक करायची हा मोठा प्रश्न काँग्रेस पक्षापुढे निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – कमल हसन, भाजपला ठसन; पण कॉंग्रेस फसेल…)

मुख्यमंत्रीपदासाठी (Karnataka Election 2023) सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार या दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. सिद्धारमय्या यांना डीके शिवकुमार यांच्यापेक्षा दुप्पट आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे पारडं जड असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

मात्र कर्नाटकचा (Karnataka Election 2023) मुख्यमंत्री ठरवण्याचा सर्वाधिकार काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्यात आले आहेत. आमदारांशी चर्चा केल्यानंतर बहुतांशी आमदार हे सिद्धारमय्या यांच्यामागे असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सिद्धारमय्या हे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत.

हेही पहा – 

मल्लिकार्जुन खर्गे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेत सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Karnataka Election 2023)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.