Heat waves : राज्यात उष्णतेची लाट; वाढत्या तापमानामुळे केळीच्या पिकाचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४ अंशाच्या पुढे गेला

147
Heat waves : राज्यात उष्णतेची लाट; वाढत्या तापमानामुळे केळीच्या पिकाचे नुकसान

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) वाढणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे तर दुसरीकडे तापमानात पुन्हा वाढ होत आहे.

(हेही वाचा – Heat Wave: राज्यात तापमानाचा पारा वाढला; मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा)

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात ४० अंशांपेक्षा (Heat waves) जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४ अंशाच्या पुढे गेला असून, धुळे, परभणी वर्धा येथे तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे.

हेही पहा – 

वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या

वाढत्या उष्णतेचा (Heat waves) परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हिंगोलीत तर वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचं तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे या केळीच्या बागा होरपळून निघत आहेत. केळीची पानं या तापमानामुळे (Heat waves) पिवळी पडत आहेत, तर काही पानं वाळली आहेत. केळीच्या झाडांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं अनेक केळीची झाडं उन्मळून पडली आहेत, तर तापमान वाढल्यानं केळीच्या फळांवर काळे डाग पडत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.