भारतीय कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात देशातील ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे दिग्गज कुस्तीपटू यांनी पुन्हा जंतरमंतर येथे आंदोलन सुरु केले असून ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांनतर दिल्ली पोलिसांसमोर ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) याने जबाब नोंदवला असून त्याच्यावर झालेले आरोप त्याने फेटाळले आहेत. परंतु, ब्रिजभूषण सिंहला अटक होत नाही तोवर जंतरमंतर सोडणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष निरीक्षण समिती नेमण्यात आली आहे. या समितीसमोर पीडितांची बाजू मांडण्यात आली आहे. परंतु, पीडितांची बाजू ऐकताना समितीने तक्रारकर्त्यांनाच सुनावले आहे.
(हेही वाचा –Brij Bhushan Singh : दिल्लीमधील जंतरमंतर येथे कलम १४४ लागू)
ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) वडिलांसारखे आहेत. त्यांनी कोणत्याही वाईट हेतुने स्पर्श केला नसेल. तसंच, त्यांच्या वागण्यातून कदाचित गैरसमज निर्माण झाला असेल, ते निष्पाप असल्याचं समितीने पीडितांना सांगितलं आहे.
बॉक्सर आणि राज्यसभेच्या माजी खासदार मेरी कॉम, एसएआयचे संचालक राधिका श्रीमान, क्रीडा मंत्रालयाचे माजी सीईओ राजेश राजागोपालन, माजी शटरल तृप्ती मुरुगुंडे, ऑलिम्पिक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि जागतिक चॅम्पिअनशिप पदक विजेती बबिता फोगाट हे या समितीचे सदस्य आहेत. (Brij Bhushan Singh)
हेही पहा –
आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या असून १२ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये काही पैलवानांचाही समावेश आहे. (Brij Bhushan Singh)
Join Our WhatsApp Community