सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाला सहानुभूती मिळणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगितले जात आहे. याचंसंदर्भातील प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला असता, ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना कसली सहानुभूती मिळणार? लोकांसाठी २५ वर्षात उद्धव ठाकरेंनी काय केले? असे सवाल देशपांडे यांनी यावेळी केला.
(हेही वाचा – संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी; संजय शिरसाटांचा टोला)
नक्की संदीप देशपांडे काय म्हणाले?
मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे म्हणाले की, ‘मुंबईची ज्यापद्धतीने वाट गेल्या २५ वर्षात शिवसेनेने लावली आहे. त्याची सहानुभूती त्यांना पाहिजे का? कसली सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळणार असे वाटतेय? खड्डे वाले रस्ते केले त्यांची सहानुभूती मिळणार का? कोरोनाचा काळात हाल झाले, त्यांची सहानुभूती मिळणार का? कोरोना काळात रुग्णाचे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले, त्याची सहानुभूती मिळणार का? कोरोना काळात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, कोट्यवधी रुपये खाल्ले गेले, त्याची सहानुभूती मिळणार का? नक्की कसली सहानुभूती मिळणार? तुमच्या पक्षात आपापसात भांडण झाली आहेत, याच्याशी लोकांना काय घेण-देण? त्यांनी ५० खोके खाल्ले काय, त्यांनी तुमच्या पाठित खंजीर खुपसला काय किंवा तुम्ही त्यांना काय दिले, याच्याशी लोकांना काय घेण-देण? लोकांसाठी २५ वर्षात उद्धव ठाकरेंनी काय केले? हा या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे, मला असे वाटतेय.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community