आर्थिक मंदी, वाढणारा खर्च, घटणारी मागणी अशी करणं देत अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून (Staff Reduction) टाकलं आहे. विशेषतः टेक कंपन्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. अशातच पुन्हा एकदा एका टेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचे ठरवले आहे. याआधी गूगल, अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, मिशो यासाख्या इतर कंपन्यांनी देखील नोकरकपात केली आहे.
(हेही वाचा – Mobile Phone : फोन हरवला तरी घाबरू नका; ‘या’ सोयीमुळे पटकन फोन परत मिळणार)
जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन या कंपनीने (Vodafone) तब्बल ११ हजार कर्मचार्यांना (Staff Reduction) कामावरुन कमी करण्याचे सांगितले आहे. कंपनीमध्ये कठोर बदलांची गरज आहे, असं कंपनीच्या सीईओ मार्गरेट डेला व्हॅले यांनी म्हटलं. पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीनंतर कंपनीने ही घोषणा केली आहे.
सीईओंनी सांगितलं की, कंपनीची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. अशा परिस्थितीत कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल (Staff Reduction) करण्याची गरज भासू लागली आहे. सध्या जगभरात १,०४,००० कर्मचारी आहेत.
हेही पहा –
वोडाफोन ही कंपनी भारतात आयडियासोबत मिळून काम करत आहे. मात्र भारतातही सध्या कंपनी तोट्यात आहे. त्यामुळे भारतातील कर्मचाऱ्यांवरही नोकर कपातीचा (Staff Reduction) धोका आहे.
Join Our WhatsApp Community