G-20 : तुर्कीची काश्मीरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय Y20 बैठकीत हजेरी; पाकिस्तानचा जळफळाट

तुर्कीने या बैठकीत उपस्थिती लावून पाकिस्तानला जोरदार चपराक मारली आहे, असे समजले जाते.

159

काश्मीर विद्यापीठाने G-20 च्या भारताच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय Y20 सल्लागार बैठक आयोजित केली. ही बैठक G-20 चाच भाग आहे. त्यात इंडोनेशिया, मेक्सिको, तुर्की, रशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक, युनायटेड स्टेट्स, ब्राझील आणि नायजेरिया या G20 देशांमधील 17 युवा प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठात दोन दिवसीय कार्यक्रमात सहभाग घेतला.

काश्मीर विद्यापीठातील एकूण 108 विद्यार्थी, जम्मू आणि काश्मीरच्या आसपासच्या शाळांमधील 34 विद्यार्थी, श्रीनगरच्या आसपासच्या महाविद्यालयातील 57 विद्यार्थी, जम्मूमधील 11 विद्यार्थ्यांची महाविद्यालये सहभागी झाले होते. अनेक देशांच्या सहभागाने हा जागतिक कार्यक्रम भविष्यात बदल घडवून आणेल. अनेक तरुण विद्यार्थी आणि प्रतिनिधी या जगावर प्रभाव टाकू शकतात. विशेष म्हणजे या बैठकीत तुर्कीचा सहभाग तोही काश्मीरमध्ये होणे ही पाकिस्तानसाठी जळफळाट निर्माण करणारी घटना आहे. काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची बाजू उघडपणे घेणारा तुर्की हा एकच देश होता, मात्र आता तोही काश्मीरमध्ये भारताने बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहिल्याने पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याआधीही पाकिस्तानने तुर्कीला भारतातील G-20 च्या बैठकीवर बहिष्कार टाकावा, अशी विनंती केली होती, परंतु याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. तुर्कीने या बैठकीत उपस्थिती लावून पाकिस्तानला जोरदार चपराक मारली आहे, असे समजले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.