खडकवासला धरणसाखळीमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे शहराला पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. शिवाय, मान्सूनचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन येत्या १८ मेपासून दर गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी जलशुद्धीकरण केंद्रही बंद ठेवण्यात येणार असल्याने टॅंकर भरणा केंद्रही बंद असतील. खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यातच, यावर्षी एल निनो समुद्री प्रवाहामुळे खासगी हवामान संस्थांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
(हेही वाचा – Heat waves : राज्यात उष्णतेची लाट; वाढत्या तापमानामुळे केळीच्या पिकाचे नुकसान)
परिणामी, राज्य शासनाकडून महापालिका तसेच पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे ३१ ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने तूर्तास १८ मेपासून ऑगस्ट अखेरपर्यंत प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत सुमारे १५ दिवसांचे पाणी वाचविले जाणार आहे. दरम्यान, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पाण्याचा आढावा घेऊन कपात वाढविण्यात येणार असल्याचेही यापूर्वीच महापालिकेने जाहीर केलेले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community