राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या ४५व्या कांदबरीचे प्रकाशन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित पद्यगंधा प्रतिष्ठानच्यावतीने होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ असे या कादंबरीचे नाव असून हा प्रकाशन सोहळा २७ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे.
(हेही वाचा – कर्नाटक इफेक्ट; भाजपला हवाय खासदारांचा लेखाजोखा)
यापूर्वी ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ ही कादंबरी ‘जयोस्तुते’ या नावाने हिंदी भाषेत देखील संघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गुजरातमध्ये प्रकाशित झाली होती. शुभांगी भडभडे यांच्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन सोहळा २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री शक्तिपीठ रामनगर येथे आयोजित करण्यात आाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कादंबरीचे नागपूर येथे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. स. जोग असणार आहेत. तसेच कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी हे या कादंबरीवर तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community