विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील (BMC) रस्त्यांच्या कामांचा अनुभव ग्राह्य न धरता ज्या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवला होता, त्याच कंपनीला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अनुभवावर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या डागडुजीचे काम सोपवण्यात आले आहे. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी १३१ कोटी रुपये खर्च केले जाणार असून ज्या कंपनीच्या कामांबाबत महापालिका प्रशासन समाधानी नाही, तिथे एवढ्या कोटींचे काम काही वर्षांपूर्वी काळ्या यादीत टाकलेल्या आणि आता डाग पुसून पुन्हा महापालिकेत सक्रिय झालेल्या कंपनीला काम देण्याचा धाडसी निर्णय आयुक्त (BMC) व प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) यांनी कसा आणि का घेतला असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महानगर (BMC) प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ०३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल आणि तातडीची कामे करण्यासाठी आणि या कालावधीमध्ये पावसाळ्या दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांच्या कालावधी करता कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निविदेत के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड – कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने उणे २७ टक्के दराने हे काम मिळवले असून हे काम विविध करांसह १३१कोटींमध्ये केले जाणार आहेत.
(हेही वाचा – Shri Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मुख्य प्रवेशद्वाराचं हिंदू महासंघ करणार शुद्धीकरण)
यासाठी पात्र ठरलेल्या के.आर.कंट्रक्शन या कंपनीने वांद्रे ते जोगेश्वरी पश्चिम या भागातील जोड रस्त्यांच्या साईट पट्टीचे मास्टिक डांबर द्वारे जे. कुमार कंपनी सोबत संयुक्त भागीदारीतत केलेल्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र जे. कुमार आणि संबंधित के.आर.कंट्रक्शन कंपनीला रस्ते घोटाळ्याच्या चौकशीत अंतिमत: काळ्या यादीत टाकण्यात आले होते. शिवाय काम अर्धवट सोडणे, काम योग्य प्रकारे न करणे, कामे पूर्ण करण्यात दिरंगाई करणे, त्यांचे आर्थिक अपयश यासारख्या खराब कामगिरीचा पूर्वानुभव या सर्व कामांमुळे या कंपनीने सादर केलेले प्रस्तावित प्रमाणपत्र पात्रता निकषाकरता ग्राह्य धरण्यात आले नाही. (BMC)
त्यांच्या या कामाचा अनुभव महापालिकेने (BMC) गृहीत धरला नाही. त्यानंतर या पात्र ठरलेल्या कंपनीने मेट्रो रेल्वेत केल्या कामाच्या आधारे प्रमाणपत्र सादर केले. या कंपनीने एमएमआरडीए यांच्याकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्र सादर केले, त्यामध्ये त्याने आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओव्हरी पाडा आणि दहिसर पूर्व येथील मेट्रो स्टेशन लाईन सातची अंमलबजावणी करणे या कामात करता६२५८ मीटर लांबीचे काम केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले या प्रमाणपत्राच्या आधारे या कंपनीला पात्र ठरवण्यात आले आहे.
हेही पहा –
विशेष म्हणजे या संयुक्त भागीदारीत असलेल्या कंपनीला दोन वर्षाकरिता काळा यादीत टाकण्यात आले होते तसेच काम अर्धवट सोडणे, काम योग्य प्रकारे न करणे, कामे पूर्ण करण्यात दिरंगाई करणे तसेच आर्थिक अपयश यासारख्या खराब कामगिरीचा पूर्व अनुभव या सर्व कामांमुळे ज्या कंपनीचे सादर केलेले प्रमाणपत्र पात्रता निकषाकरता ग्राह्य धरण्यात आले नाही. त्यामुळे ही कंपनी बाद होणे स्वाभाविक होते. परंतु ही कंपनी महापालिकेतील (BMC) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने निविदा उघडण्यात आल्यानंतर त्यांना अन्य कामाच्या प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे संबंधित कंपनीने मेट्रो रेल्वेची कामे केल्याच्या अनुभवाची प्रमाणपत्र सादर केली. या मेट्रोच्या प्रमाणपत्र निकषाद्वारे या पश्चिम द्रुतगती महामार्गच्या रस्ते कामासाठी नियुक्त करण्याचा प्रताप रस्ते विभाग आणि संबंधित विभागाच्या अतिरिक्त आयुक्त यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. (BMC)
Join Our WhatsApp Community