DRDO संचालक कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट करावी; महाराष्ट्र एटीएसची मागणी

प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) कडून कथितपणे हनी ट्रॅपिंग केल्यानंतर गोपनीय माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

187
DRDO संचालक कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट करावी; महाराष्ट्र एटीएसची मागणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर निवृत्तीला सहा महिने बाकी असतांना (DRDO) ते हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे आता दहशतवादी विरोधी पथकाने संचालकवर मोठी कारवाई केली.

(हेही वाचा – DRDO : डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएसची कोठडी)

अशातच संचालक प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांची पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्याची मागणी महाराष्ट्र एटीएसनं (Maharashtra ATS) केली आहे. महाराष्ट्र एटीएसनं मंगळवारी १६ मे रोजी पुणे सेशन कोर्टात एक अर्ज दाखल करुन ही मागणी केली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेराला नक्की काय-काय सांगितलं आहे, त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते,पैशांची देवाणघेवाणही झाली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पॉलिग्राफ टेस्टमधून मिळेल, असा एटीएसचा विश्वास आहे.

हेही पहा – 

दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) कडून कथितपणे हनी ट्रॅपिंग केल्यानंतर गोपनीय माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.