दादर येथील शिवसेना भवनात झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिला.राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात तसेच तळागाळात पोहोचवा असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसंच १८ जूनला मुंबईत पदाधिकारी यांचा मेळावा घेणार असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
निवडणुकीच्या दृष्टीने तयार रहा, गाफील राहू नका…
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभेसह महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. तसंच या बैठकीत पुढील निवडणुकांवर रणनीति ठरवण्यात आली. शिवाय जून १८ तारखेला पदाधिकारी यांचा मेळावा घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
(हेही वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ठाकरे गट नाराज; बैठकीत एक आणि बाहेर एक)
बैठकीपूर्वी ठाकरे गटाला धक्का…
ठाकरे गटाची गुरुवारी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community