Maharashtra Board : प्रतिक्षा संपली, ‘या’ तारखेला लागणार दहावी – बारावीचा निकाल

यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान झाली होती. या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

278
Maharashtra Board : प्रतिक्षा संपली, 'या' तारखेला लागणार दहावी - बारावीचा निकाल

नुकताच सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (Maharashtra Board) जाहीर झाला. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) परीक्षेचा निकाल केव्हा लागणार असा विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडला होता. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल १० जून रोजी तर बारावीचा ३१ मे रोजी लागण्याची शक्यता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा – CBSE 10th Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही जाहीर)

यंदा बारावीची (Maharashtra Board) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान झाली होती. या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या नंतर जु्न्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम बंद होते. या सगळ्या गोंधळात सहा – सात दिवस बारावीच्या (Maharashtra Board) उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नव्हत्या. यामुळे दरवर्षीपेक्षा २०२३ मध्ये निकाल लागायला विलंब लागेल अशी भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होती. पण आता मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल लागणार आहे. ३१ मे च्या आसपास हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Board)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.