‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाने 12 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अखेर तो यूकेमध्येही प्रदर्शित होत आहे. यापूर्वी हाऊसफुल्ल शो असूनही परदेशात त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते. कारण ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला रिलीज प्रमाणपत्र दिले नव्हते. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ याआधी १२ मे रोजी यूकेमध्ये रिलीज होणार होती. पण ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने (बीबीएफसी) त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. पण आता तो लवकरच ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती खुद्द दिग्दर्शकानेच ट्विटवर दिली आहे.
‘द केरळ स्टोरी’ चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ट्विटरवर आपला भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट यूकेमध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट केले, अभिनंदन ग्रेट ब्रिटन. तू जिंकलास. दहशतवाद हरला आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. … आता ब्रिटीश लोक दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी क्रांती पाहतील… #TheKeralaStory सुदीप्तो सेनचे यांचं हे ट्विट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अदा शर्मानेही रिट्विट केले आहे. ती लिहिते, तुम्हा सर्वांचे अभिनंदन! यूके मध्ये भेटू #TheKeralaStory 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, पण पश्चिम बंगाल सरकारने राज्यात चित्रपटावर बंदी घातली. तसेच, तामिळनाडूतील चित्रपटगृहांमध्येही हा दाखवला जात नाही.
(हेही वाचा उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’ हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश)
Join Our WhatsApp Community