चार दिवसांच्या मनधरणीनंतर आणि सोनिया गांधींच्या मध्यस्थीनंतर कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. डीके शिवकुमार यांनी बुधवारी केलेली अडवणूक सोडून देत सर्व बाबींना होकार दिला आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके उपमुख्यमंत्री असतील. केसी वेणुगोपाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
शिवकुमार म्हणाले, ‘मी पक्षाच्या सूत्राशी सहमत आहे. पुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि मी जबाबदारीसाठी तयार आहे. पक्षाचे हित लक्षात घेऊन मी संमती दिली आहे. काँग्रेसने बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यात पक्षाचे केंद्रीय निरीक्षकही पोहोचणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा २० मे रोजी बंगळुरू येथे होणार आहे. यापूर्वी राहुल आणि खर्गे यांच्या सिद्धरामय्या आणि डीके यांच्यासोबत झालेल्या दोन बैठका अनिर्णित ठरल्या होत्या.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग अंगीकारल्यामुळे संजय राऊतांकडून लव्ह जिहादचा प्रचार; सोमय्यांची जहरी टीका)
सोनिया गांधींच्या संवादानंतर डीके यांनी दिला होकार
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सोनिया गांधी यांनी डीके यांच्याशी चर्चा केली. त्यानंतरच डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी राजी झाले.
लोकसभा निवडणुकीनंतर डीके मुख्यमंत्री होणार
शिवकुमार यांनी ५०-५० फॉर्म्युला मान्य केला आहे. पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर पुढील अडीच वर्षे डीके असतील. म्हणजे २०२५ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर डीके मुख्यमंत्री होतील. मात्र, आता कर्नाटकचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याचे नाव निश्चित झालेले नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community