संपूर्ण देशात सध्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. काही शहरांत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटाचा मुद्दा न्यायालयात आहे. अशातच अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामुळे (The Kerala Story) निर्माण झालेल्या वातावरणावर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पोंक्षे यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर गेली सव्वाशे वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र तरीही हिंदू एक झालेला नाही. यासारखे दुःख नाही.” असं विधान केलं आहे.
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हे वक्तव्य केलं आहे. या व्हिडिओमध्ये ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘काळे पाणी’ ही कादंबरी वाचतांना दिसत आहे.
(हेही वाचा – ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचा दाखला देत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणून पवारांचे मानले आभार)
नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?
“सध्या जे चालू आहे केरळ स्टोरी (The Kerala Story) वरून अचानक हिंदू जागा झाला आहे. सावरकर गेली सव्वाशे वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडत आहेत. १९६६ मध्ये ते गेले, पण आमच्यासारख्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून आम्ही सावरकर मांडायचा प्रयत्न करतो. सावरकरांनी संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी वेचलं. तरी हिंदू एक होत नाहीये, अजूनही जागा होत नाहीये यासारखे दुःख नाही. ‘ऐकू या सावरकर, वाचू या सावरकर’. आपण सगळ्यांनी एक होऊ या. हिंदू धर्मातील सर्व जाती संपवून हिंदू ही एकमेव जात निर्माण करू या. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करू या.”
— SHARAD PONKSHE (@ponkshes) May 18, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community