गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पक्षांतराच्या चर्चा, शरद पवार यांच्या निवृत्तीची घोषणा, सत्ता संघर्ष इत्यादी सारख्या अनेक घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे राजकारणातील हालचालींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकचा दौरा करणार आहेत. माहितीनुसार, राज ठाकरे १९ मे शुक्रवार पासून पुढील तीन दिवस नाशिक दौरा करणार आहेत.
(हेही वाचा –Eknath Shinde : मैला सफाईच्या यंत्रसामुग्रीसाठी अर्थसहाय्य ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती)
राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) या दौऱ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची मनसेची रणनीती ठरवली जाणार आहे. बैठकींचे सत्र १९ ते २१ मे असे तीन दिवस सुरू राहणार आहे. सव्वा वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
त्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) प्रथम नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहर पदाधिकाऱ्यांशी स्वतः चर्चा करणार आहेत. तसेच रविवार २१ मे रोजी ते क्रेडाईसह विविध संघटनांशी संवाद साधणार आहेत.
Join Our WhatsApp Community