Sameer Wankhede : समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट उघड; वानखेडेंच्या अडचणीत वाढ

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सीबीआय कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

192
Sameer Wankhede : समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट उघड; वानखेडेंच्या अडचणीत वाढ

कार्डेलिया क्रूझवर बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि अन्य तिघांविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर सीबीआय कडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत त्यांच्या घराची, आणि अन्य ठिकाणांची झडती घेण्यात आली.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान समितीचा एक अहवाल आला आहे. या अहवालात वानखेडेंविरोधात (Sameer Wankhede) अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

(हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना दिल्ली हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा)

समितीने सादर केलेल्या अहवालानुसार; शाहरुख खान आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील चॅट उघड झाले आहे. यामध्ये माझ्या मुलाची काळजी घे असं शाहरुखने अनेकदा म्हंटले आहे. शाहरुख आणि समीर वानखेडे यांच्यातील चॅट सोबतच वानखेडे यांनी केलेले परदेश दौरे आणि त्यांच्या मुंबई मधील मालमत्तेचा खुलासा करण्यात आला आहे.

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी २०१७ ते २०२१ दरम्यान सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे समावेश आहे. या परदेश दौऱ्यांसाठी समीर वानखेडे यांनी ८.७५ लाखांचा खर्च दाखवला आहे, जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या १९ दिवसांच्या सहलीसाठी, वानखेडेने यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. एवढंच नाही तर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही दक्षता अहवालात करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे आहे. तसंच, मुंबईत त्यांच्या नावे सहा मालमत्ता असून ते वडिलोपार्जित मालमत्ता आहेत, असंही अहवालातून स्पष्ट झालं आहे.

हेही पहा –

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सीबीआय कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयची कारवाई कोणत्या आधारावर सुरू आहे? माझ्या घरी सर्च ऑपरेशन का केले? असा प्रश्न करत माझ्यावर अन्याय होत असल्याचे वानखेडे यांनी याचिकेतून म्हटले होते. त्या याचिकेवर सुनावणी करतांना दिल्ली हायकोर्टाने सीबीआयला समीर वानखेडे यांना २२ मे पर्यंत अटक करता येणार नाही. त्याशिवाय, कायमस्वरुपी दिलासा मिळवण्यासाठी वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागावी असे निर्देशही दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. (Sameer Wankhede)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.