भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय जाहीर केला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
RBI to withdraw Rs 2,000 currency notes from circulation; the notes will continue to be legal tender till September 30: Statement
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023
याआधी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री अचानक नोटबंदी जाहीर केली होती, त्यावेळी त्यांनी ५०० आणि १००० रुपयांची नोट मागे घेतली होती. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला होता. पुढील ३ महिने देशभरात बँकांमधील चलन व्यवहारांमध्ये कमालीची मर्यादा आणली होती, त्यामुळे कोट्यवधी जनतेची गैरसोय झाली होती. शुक्रवार, १९ मे रोजी आरबीआयने आता २ हजार रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना मागील नोट बंदीची आठवण आली आहे.
Join Our WhatsApp Community