Patent : पेटंट पध्दती अभ्सासणे गरजेचे – कुलगुरू माधुरी कानिटकर

कुलगुरु कानिटकर यांनी सांगितले की, "पेटंटचे (patent) महत्व संशोधकाला समजणे गरजेचे आहे यासाठी सुयोग्य पध्दतीचा अवलंब कसा करावा यासाठी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

224
patent : पेटंट पध्दती अभ्सासणे गरजेचे - कुलगुरू माधुरी कानिटकर

संशोधनाला मूल्य प्राप्त करुन देण्यासाठी पेटंटची (patent) आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंटमुळे संशोधनाला मान्यता प्राप्त होते. पेटंट दाखल करण्याच्या सुयोग्य पध्दतींचा अवलंब करण्यासाठी त्याची पध्दती अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी केले.

(हेही वाचा – जम्मू-काश्मिरात चार ठिकाणी NIAची छापेमारी)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’वर्कशॉप ऑन पेटंट (patent) अॅण्ड आयपीआर’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी कुलगुरु माधुरी कानिटकर कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू , एमपीजीआयचे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा, ’विगो’ लायब्ररी फाऊंडेशनचे संस्थापक निलेश पावसकर, जयंत ठोंबरे, डॉ. सौरव सेन आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही पहा – 

कुलगुरु कानिटकर यांनी सांगितले की, “पेटंटचे (patent) महत्व संशोधकाला समजणे गरजेचे आहे यासाठी सुयोग्य पध्दतीचा अवलंब कसा करावा यासाठी योग्य माहिती असणे गरजेचे आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोठया प्रमाणात प्रगती होत आहे. यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानाचा शोध आपल्या देशातही होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून वापरत असलेली पध्दती पेटंट होऊन परदेशातून आल्यावर आपणास तिचे महत्व समजते याकरीता संशोधनाला प्रसिध्दी देण्यापेक्षा पेटंटकडे लक्ष केदं्रीत करावे. पेटंटमुळे (patent) संशोधनाचे मूल्य व दर्जा वाढतो. संशोधकांना पेटंटचे महत्व कळावे याकरीता कार्यशाळा महत्वपूर्ण असून संशोधकांनी पेटंट पध्दतीचा सुयोग्य वापर करावा असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.