तब्बल पाच तासांच्या सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडे सिद्धिविनायकाच्या चरणी; म्हणाले….

187
तब्बल पाच तासांच्या सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडे सिद्धिविनायकच्या चरणी; म्हणाले....
तब्बल पाच तासांच्या सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडे सिद्धिविनायकच्या चरणी; म्हणाले....

बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप एनसीबी विभाग मुंबईचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला आहे. याच प्रकरणी शनिवारी, २० मे रोजी सीबीआयकडून तब्बल पाच तास समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर समीर समीर वानखेडे दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. त्यावेळी वानखेडे यांनी न्यायालय, सीबीआय आणि केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास असल्याची भावना व्यक्त केली.

एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, सिद्धिविनायक आमचे दैवत आहे. त्यामुळे याप्रकरणात विजय मिळू देते, अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी येथे आलो होतो. आमचा विजय निश्चित होईल. कारण आम्ही सगळे योग्य काम केले आहे आणि आम्ही ते पुढे करत राहू. न्यायालय, सीबीआय आणि केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे.

(हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट उघड; वानखेडेंच्या अडचणीत वाढ)

दरम्यान शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास समीर वानखेडे मुंबईतील बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले होते. यावेळी वानखेडे यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राची प्रत होती. आपण कायदा आणि संविधान मानणारे व्यक्ती आहोत, असा दाखवण्याचा प्रयत्न वानखेडे यांनी यावेळी केल्याचे बोलले गेले. दरम्यान चौकशीला निघाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना वानखेडे म्हणाले की, ‘सत्यमेव जयते. १०० टक्के सीबीआयच्या चौकशीत सहकार्य करणार आहे.’ दरम्यान आता सीबीआयच्या चौकशीतून काय नवे खुलासे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.