The Kerala Story : चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांमध्ये वाद; शो बंद करण्याची मागणी

नीती या संस्थेच्या माध्यमातून द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

259
The Kerala Story : चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांमध्ये वाद; शो बंद करण्याची मागणी

हिंदू मुलींना फसवून त्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दल तिरस्कार निर्माण (The Kerala Story) करणे, विवाहपूर्व त्यांना गरोदर करणे, त्यानंतर त्यांचे मुसलमान धर्मात धर्मांतर करणे, पुढे त्यांना सीरिया येथे नेवून आयसिस सारख्या दहशतवादी संघटनांच्या हवाली करून तिथे त्यांचा वेश्या म्हणून उपयोग करणे अशा वास्तववादी कथेवर आधारित द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटावरून अनेक वाद सुरु आहेत. एकीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे तर दुसरीकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी होत आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यात दोन गटांमध्ये राडा झाला.

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII येथे चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटाचे (The Kerala Story) समर्थक आणि विरोधकांमध्ये शनिवार २० मे रोजी राडा झाला. नीती या संस्थेच्या माध्यमातून द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एफ टी आय आय मधील काही विद्यार्थ्यांनी या शोला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली आणि हा शो बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे केरला स्टोरीज या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक देखील या शोसाठी उपस्थित होते.

(हेही वाचा – The Kerala Story : ‘मी इतकी कट्टर झाली होती की जर कोणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर ठार मारले असते; धर्मांतराच्या कचाट्यातून बाहेर पडलेली पीडिता सांगते)

‘द केरळ स्टोरी’चे (The Kerala Story) दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माता विपुल शाह या स्क्रिनिंगला उपस्थित होते. स्क्रिनिंगला उपस्थित असलेल्या काही लोकांनी शो संपल्यानंतर चित्रपटाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने भावना अधिक तीव्र झाल्या. तर काही विद्यार्थ्यांनी या चित्रपटाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. २०२० च्या तुकडीतील निलंबित विद्यार्थ्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर बसलेल्या विद्यार्थ्यांनीही या आंदोलकांमध्ये सामील होऊन घोषणाबाजी केली.

पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या ताफ्याने त्वरीत हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. चित्रपटाचे निर्माते शाह म्हणाले, “माझा चित्रपट (The Kerala Story) आपल्या देशातील प्रीमियर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रदर्शित झाल्याचा मला आनंद आहे. स्क्रीनिंग शोमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अडवणूक केली. आम्ही आंदोलकांशी बोललो आणि प्रकरण मिटले. आंदोलकांनी त्यांचा लोकशाही अधिकार वापरला आणि उलट मत व्यक्त केले. दरम्यान, FTIISA चे अध्यक्ष यांनी एक प्रेस रीलिझ जारी केले आहे, त्यानुसार “FTII च्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली नव्हती.”

हेही पहा – 

दरम्यान आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही या चित्रपटाचा (The Kerala Story) निषेध करतो कारण हा चित्रपट ज्या नीच विचारांचा प्रचार करत आहे त्याचा निषेध करणे हे विद्यार्थी समाजाचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो.” ते पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या संस्थेतील अशा इस्लामोफोबियाच्या विरोधात ठामपणे उभे आहोत. आमची संस्था आणि आमचे मुख्य थिएटर, जिथे आम्ही शिकतो आणि जिथे विद्यार्थी म्हणून आमची भरभराट होते, तिथे अशा गोष्टींसाठी जागा नाही. या चित्रपटातील अपप्रचार किंवा त्यातून आपल्या समाजाची होणारी हानी या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.