Neeraj Singh Rathod : मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर

भाजप आमदार विकास कुंभारे यांना देखील नीरज सिंह (Neeraj Singh Rathod) याने फोन केला होता. मात्र विकास कुंभारे यांना संशय आल्यामुळे त्यांनी चौकशी केली

160
Neeraj Singh Rathod : मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष (Neeraj Singh Rathod) दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. धक्कादायक म्हणजे आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आरोपी नीरज सिंह राठोड (Neeraj Singh Rathod) याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नावाचा वापर करून सगळ्यांना गंडा (Fraud) घातला.

(हेही वाचा – Fraud : मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक)

आरोपी नीरज सिंह राठोड (Neeraj Singh Rathod) यांने तब्बल २८ आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये २८ आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सारखा आवाज काढून नीरज सिंहने (Neeraj Singh Rathod) आमदारांची फसवणूक केली. नीरज सिंह यांच्या आवाजामुळे भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची भुरळ पडली होती. फेब्रुवारी २०२३ पासून अगदी काल परवापर्यंत महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक आमदारांना निरज सिंह राठोड नावाच्या एका व्यक्तीचे फोन येत होते. तो स्वतःला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा पीए सांगत असे. महाराष्ट्रातील भाजप आमदारांना तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचे ठरले आहे असे सांगायचा. एवढचं नाही तर तुम्हाला कोणतं मंत्रिपद हवं आहे याची विचारणा देखील करायचा.

हेही पहा – 

भाजप आमदार विकास कुंभारे यांना देखील नीरज सिंह (Neeraj Singh Rathod) याने फोन केला होता. मात्र विकास कुंभारे यांना संशय आल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता हा त्यांना लुबाडण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.