Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बैठक

येत्या सप्टेंबर महिन्यात G-20 परिषदेनिमित्त ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांचं भारतात स्वागत करण्याबाबत पंतप्रधान (Narendra Modi) उत्सुक आहेत.

149
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष महामहीम लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची 21 मे रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली.

या दोन नेत्यांमधली (Narendra Modi) ही पहिली बैठक होती. हे वर्ष राजनैतिक संबंध स्थापनेचे 75 वे वर्ष असल्याची या दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली. उभय नेत्यांनी आपल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि विशेषत्वाने संरक्षण उत्पादन, व्यापार, औषधनिर्मिती, कृषी, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन तसेच जैव इंधन आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात ही भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याच्या बाबींवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील वरिष्ठ उद्योजकांची एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यावर दोन्ही नेत्यांनी यावेळी भर दिला.

(हेही वाचा – Neeraj Singh Rathod : मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर)

या दोन्ही नेत्यांनी (Narendra Modi) क्षेत्रीय विकास साधण्याच्या दृष्टिकोनाबाबत परस्परांशी संवाद साधला. बहुपक्षीय व्यासपीठांवर सातत्यपूर्ण सहकार्याच्या महत्त्वावर तसेच बहुपक्षीय संस्थांच्या सुधारणाबाबत दीर्घकालीन उपाययोजनांच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

हेही पहा – 

येत्या सप्टेंबर महिन्यात G-20 परिषदेनिमित्त ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांचं भारतात स्वागत करण्याबाबत पंतप्रधान (Narendra Modi) उत्सुक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.