Raj Thackeray : “… मग माझ्याकडे का येतात?” ; राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल

शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे, मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे थांबलं पाहिजे.

191
Raj Thackeray : "... मग माझ्याकडे का येतात?" ; राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल

गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील हालचालींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

(हेही वाचा – Raj Thackeray : “मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाहीत” – राज ठाकरे)

रविवार २१ मे रोजी सकाळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेची सक्तीची वसुली, कांदा दर घसरण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन करत आवाज उठविल्याशिवाय शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळणार नाही, तुम्ही सर्वानी एकत्र येऊन हा लढा उभारणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही पहा – 

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे, मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे थांबलं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. ‘तुम्ही मला (Raj Thackeray) मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? असा प्रश्न राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांना केला. ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केलं ना? असे सांगत ‘जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता..याचं भान तुम्ही ठेवायला हवं..’ असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे म्हणणे ऐकून घेत ‘शेतकरी सगळे आता तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. त्यावर येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आश्वासन दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.