एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २२ ते २४ मे दरम्यान विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray : “… मग माझ्याकडे का येतात?” ; राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल)
देशातील हवामानात (Unseasonal rain) सातत्याने चढउतार पहायला मिळत आहेत. दोन दिवस नागरिकांना कडाक्याचे ऊन आणि वादळी पावसाचा सामना करावा लागू शकतो.
बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे (Unseasonal rain) पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पश्चिमी अडथळ्यांच्या प्रभावामुळे वायव्य भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २२ ते २४ मे रोजी विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही पहा –
या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे. तर उन्हामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community