‘उबाठा’ शिवसेनेचे पाकीटमारीत मोठे नाव; आशिष शेलारांचा हल्लाबोल

232
'उबाठा' शिवसेनेचे पाकीटमारीत मोठे नाव; आशिष शेलारांचा हल्लाबोल
'उबाठा' शिवसेनेचे पाकीटमारीत मोठे नाव; आशिष शेलारांचा हल्लाबोल

१९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता. मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपलं म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे… पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी, २१ मे रोजी दादर वसंत स्मृती येथे झाली. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पुनम महाजन, खासदार मनोज कोटक यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. शेलार म्हणाले, आम्ही टीव्हीवर वर्तमानपत्रात पाहिली मविआची बैठक… शरद पवार त्याचे प्रमुख. त्यांच्या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती त्यानंतर सोफ्यांची रांग होती… या सोफ्यावर बसलेल्या उद्धवजींना पाहिलं आणि मला गाणं आठवलं ‘कोण होतास तू काय झालास तू…’ ज्यावेळी आमच्यासोबत होतात; त्यावेळी देशाचं नेतृत्व तुमच्याकडे येत होतं. आज आम्हाला सोडून गेलात तर केजरीवाल ते केसीआरपर्यंत सतत सगळीकडे जावं लागतय. आमच्याबरोबर होतात तेव्हा खुर्चीचा सन्मान होता. आता तुम्हाला सोफ्याच्या रांगेत बसावं लागतंय. आमच्याबरोबर होतात तेव्हा शिवतीर्थावर तुमच्या सभा व्हायच्या. बीकेसीची चार मैदाने भरायची. आम्हाला सोडून गेलात तर तीन पक्ष एक होऊनसुद्धा आम्ही जे मैदान पार्किंगसाठी वापरलं तिथे तुमची सभा होते.

(हेही वाचा – Nitesh Rane : नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंविषयी केला गौप्यस्फोट; म्हणाले…)

पावसाआधी मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नाल्यावर भारतीय जनता पार्टीची माणसं जातात. तुम्ही का नाल्यावर आला नाहीत? राज्यात सरकार हवं म्हणून आक्रोश करताय मुंबईकरांच्या समस्या ऐकून घ्यायला तुम्ही रस्त्यावर दिसत नाहीत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी १५१ चा आकडा भाजपा, शिवसेना, रिपाई आणि एनडीए भाजपा महापौराच्या नेतृत्वात दिसेल आणि उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र ईव्हीएममध्ये गडबड आहे का ? याचे क्लास करत बसतील हे चित्र मी आजच स्पष्ट करतो. त्या कामासाठी तुमच्या सगळ्यांची संपूर्ण ताकद लावा, असे शेलार यांनी केले.

राज ठाकरेंना कानपिचक्या

  • पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. मोदीजींचा देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा भरोसा आहे. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याच काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
  • २ हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचे ‘क्लीन नोट पॉलिसी’ हे धोरण आहे, हे धोरण चर्चेअंती झाले आहे. ते विविध बैठकांमध्ये सादर झाले. ज्यावर तज्ञांनी आपली मते मांडली आहेत, त्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजाराची नोट बाजारात आली त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था आहे असे आरबीआय आणि मोदीजींनी घोषित केले होते.
  • ६ लाख ३२ कोटींच्या नोटा बाजारात होत्या त्यापैकी ३ लाख कोटींच्या जर चलनात असतील; जर व्यवस्थेत असतील तर उरलेल्या ३ लाख ४० हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात हे शोधणे प्रामाणिकपणाचं काम आहे, हे जनतेला हवे आहे… चोर पकडले गेले पाहिजेत. जे सुटले आहेत त्यांना धरले पाहिजे आता हे राज ठाकरे यांना सांगा असेही ते म्हणाले. मोदीजी जे करतात ते प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला जगण्याचं प्रामाणिकतेने स्थान मिळालं पाहिजे म्हणून करतात. टीका करणाऱ्यांच स्वागत तर आहेच पण कधी कधी असं वाटतं आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणं गरजेचं आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.