Azad Maidan Riot : रझा अकादमीच्या दंगलीचा हिशेब अजून बाकीच!

मुंबई जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या दंगलप्रकरणी एकूण ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्व दंगलखोरांकडून एकूण ३६ लाख ४४ हजार ६८० रुपयांची भरपाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांना देण्यात आले.

200

त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे भांडवल करत रझा अकादमीने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढून हिंसाचार घडवून आणला. यात १० पोलिस कर्मचा-यांसह १३ जण जखमी झाले. ज्या घटनेचा महाराष्ट्राशी संबंध नसतो, परंतू त्याचे भांडवल करून महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याची रझा अकादमीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ११ ऑगस्ट २०१२ रोजी रझा अकादमीने आझाद मैदान येथे म्यानमार येथे मुसलमानांवर अत्याचार केला, त्याच्या निषेधासाठी असाच मोर्चा काढला होता. त्यावेळी मुंबई उच्च न्यायलयाने रझा अकादमीच्या ६० दंगलखोरांकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला. त्याला ११ वर्षे उलटली तरी यातील एक रुपयाही वसूल केलेला नाही. असे असतानाच रझा अकादमीकडून आणखी एकदा हिंसाचार घडला आहे.

६० दंगलखोरांकडून ३६ लाख रुपयांच्या भरपाईचा आदेश

आझाद मैदान दंगलीत कुणाचे, किती नुकसान झाले? किती दंगलखोरांवर गुन्हे दाखल झाले? किती दंगलखोरांकडून किती नुकसान भरपाई वसूल केली? याची माहिती अखिल भारतीय विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागितली. त्यावर मुंबई जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या दंगलप्रकरणी एकूण ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्व दंगलखोरांकडून एकूण ३६ लाख ४४ हजार ६८० रुपयांची भरपाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांना देण्यात आले. या दंगलीत पोलिस विभागाचे २५ लाख ७८ हजार ३७९ रुपये, बेस्टचे ३ लाख ४५ हजार ३०७ आणि अग्निशमन दलाचे ३ लाख १५ हजार ३७ रुपये नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसूल करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.

(हेही वाचा The Kerala Story : ‘मी इतकी कट्टर झाली होती की जर कोणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर ठार मारले असते; धर्मांतराच्या कचाट्यातून बाहेर पडलेली पीडिता सांगते)

दंगलखोर गायब, वसुली नाहीच

या प्रकरणी जिल्हाधिका-यांनी दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिस वसुलीसाठी संबंधित दंगलखोरांनी दिलेल्या पत्त्यावर जातात, मात्र दंगलखोर तिथे राहत नसल्याचे समजल्यावर पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. त्यामुळे यातील एक रुपयाही वसुली झालेली नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली. या दंगलीत मुंबई पोलिसांच्या एका महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला होता. ४३ पोलिसांना जखमी करण्यात आले होते, पोलिसांची वाहने, बेस्ट बसगाडीसह माध्यमांची वाहने तसेच खासगी वाहनेही पेटवली. आज या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपी जामिनावर सुटले असून मोकाट फिरत आहेत, हे त्यावेळीच्या काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचे अपयश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.