Whatsappच्या Spam Callsने त्रासला आहात? आता चिंता नको, लवकरच यावर निघणार उपाय

186
Whatsappच्या Spam Callsने त्रासला आहात? आता चिंता नको, लवकरच यावर निघणार उपाय
Whatsappच्या Spam Callsने त्रासला आहात? आता चिंता नको, लवकरच यावर निघणार उपाय

हल्ली लोकांच्या व्हॉट्सअॅपवर स्पॅम कॉल येण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. असा एखादा स्पॅम कॉल उचलला की समोरच्या व्यक्तीकडून काही नंबर डायल करण्यासाठी सांगितले जाते. हा नंबर ४०१ ने सुरू होणारा किंवा इतर कोणतेही नंबर असू शकतात. समोरून कॉल करणाऱ्या व्यक्ती इंटरनेट सर्व्हिसमधून बोलत असल्याचे किंवा मोबाईल नेटवर्क ऑपरेटर असल्याचे सांगितले जाते. अर्थात ते खोटे असते. हे लोक असे कॉल करून साध्याभोळ्या लोकांना लुबाडतात किंवा इतर काही कारणाने ब्लॅकमेल करून लोकांकडून पैसे उकळतात.

हे सगळं थांबवण्यासाठी ट्रू कॉलर हे व्हॉट्सअॅपवर एक नवीन फिचर लाँच करणार आहे. म्हणजे व्हॉट्सअॅपवर लवकरच कॉलर आयडेंटिफिकेशन सर्व्हिस सुरू करणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कोण कॉल करतंय हे तुम्हाला कळू शकेल. हे फक्त व्हॉट्सअॅप पुरतेच मर्यादित नसून इतर अॅप्सवरही हे फिचर लाँच करण्यासाठी ट्रू कॉलर प्रयत्न करत आहे. ही बातमी ऐकून सतत येणाऱ्या स्पॅम कॉलमुळे त्रासलेल्या लोकांना दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – ‘हे’ करा नाहीतर WhatsApp होईल हॅक)

ट्रू कॉलरच्या २०२१च्या रिपोर्टनुसार भारतामध्ये टेलिमार्केटिंग कॉल्स आणि स्पॅम कॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यातून कितीतरी लोकांची फसवणूक केली जाते. हे सगळं थांबवण्यासाठी ट्रू कॉलरने जिओ आणि एअरटेल सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्सना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फिल्टरचा वापर करून आपल्या नेटवर्कवर अशा प्रकारचे टेलिमार्केटिंग कॉल्स आणि स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रू कॉलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन ममेदी यांचं म्हणणं आहे की, हे फिचर लाँच झाल्यानंतर लोकांना स्पॅम कॉलमुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. पुढे त्यांनी सांगितले की, हे फिचर अजून बीटा फेजमध्ये आहे आणि मी महिन्याच्या अखेरपर्यंत हे फिचर ग्लोबल स्तरावर सुरू करेल. भारतात ट्रू कॉलरचे २५० मिलियन युजर्स आहेत. आशा आहे की या नव्या फिचरमुळे स्पॅम कॉल्सपासून लोकांची सुटका नक्कीच होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.