western railway windmill : रेल्वे रुळांवर उभारल्या पवनचक्क्या; पश्चिम रेल्वेचा अनोखा उपक्रम

पश्चिम रेल्वेवरील (western railway windmill) सर्व स्थानके ही समुद्र आणि खाड्यांपासून जवळ आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वारा वाहातो.

309
western railway windmill : रेल्वे रुळांवर उभारल्या पवनचक्क्या; पश्चिम रेल्वेचा अनोखा उपक्रम

देशातील अन्य शहरांना मागे टाकत वेगवेगळे विक्रम रचण्यात मुंबई (western railway windmill) शहर कायम अग्रेसर असते. मागच्या आठवड्यात मुंबईत अशाच एका प्रकल्पाचा श्रीगणेशा झाला आहे, जो या आधी देशात अन्यत्र कोठेही राबवण्यात आलेला नाही. पश्चिम रेल्वेने वेगवान लोकलच्या वाऱ्याच्या मदतीने ऊर्जानिर्मिती करण्याचा निश्चिय केला असून आतापर्यंत दोन स्थानकांच्या जवळ अशा पवनचक्क्या (western railway windmill) उभारण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा)

पश्चिम रेल्वे (western railway windmill) ११० किलोमीटर प्रतिवेगाने धावते. या वेगामुळे जो वारा वाहातो त्या वाऱ्याच्या साहाय्याने ऊर्जानिर्मिती होऊ शकते. त्यासाठी पश्चिम रेल्वेने खार आणि नायगाव स्थानकांत वीज निर्मितीची चाचणी मागच्या आठवड्यात सुरू केली आहे. देशातील हा पहिला रुळांजवळील पवनचक्क्यांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या हरित ऊर्जेत आपलं स्थान निर्माण होणार आहे. भारतीय रेल्वेच्या हरित ऊर्जा उपक्रमाला पश्चिम रेल्वेच्या पवनचक्की प्रकल्पामुळे गती मिळणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पश्चिम रेल्वेच्या (western railway windmill) परिसरात तसेच रुळांच्या लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते. हे अतिक्रमण रोखणे रेल्वेच्या आणि त्या परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी रेल्वेद्वारा संबंधित भागात वेगवेगळ्या कल्पक योजनांची अंमलबजावणी होते. यात हरित उपक्रमांचा समावेश होतो. फुलझाडे लावणे, शोभेच्या वनस्पतींची लागवड करणे, ऊर्जी निर्मितीसाठी सौर पॅनल बसवणे, लहान आकाराच्या पवनचक्क्या लावणे या योजनांचा समावेश हरित उपक्रमांत होतो.

हेही पहा – 

पश्चिम रेल्वेवरील (western railway windmill) सर्व स्थानके ही समुद्र आणि खाड्यांपासून जवळ आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वारा वाहातो. या वाऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे. नायगाव आणि खार स्थानकांवरील वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील स्थानकांदरम्यान सुद्धा असा प्रयोग करता येईल.

वसई
विरार
वैतरणा
सफाळा
केळवे रोड
पालघर
बोईसर
वाणगाव
डहाणू रेल्वे स्थानक

या वरील स्थानकांवर देखील पावनचक्क्यांचा (western railway windmill) प्रयत्न करता येऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.