जर तुम्ही तुमचा गुगल अकाऊंट गेल्या दोन वर्षांपासून वापरला नसेल तर सावधान. कारण गेल्या दोन वर्षांपासून ऍक्टिव्ह नसलेले गुगल अकाऊंट बंद करण्यात येतील असे गुगलने सांगितले आहे. त्यामध्ये G मेल, गुगल डॉक्स, गुगल मिट, गुगल ड्राईव्ह, गुगल कॅलेंडर तसेच गुगल फोटोज आणि युट्यूब या सर्वांचे अकाऊंट समाविष्ट असतील.
यांपैकी कोणतेही ऍप तुम्ही दोन वर्षांपासून वापरले नसेल तर गुगल तुमचं अकाऊंट कायमचं डिलीट करू शकतो. असं गुगलने त्यांच्या ब्लॉगवर स्पष्टपणे सांगितलं आहे. गुगलने सांगितलं आहे की, तसं करण्यामागे आपल्या युजर्सची सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. कारण ऍक्टिव्ह नसलेले अकाऊंट सुरक्षित नसतात, त्यांना सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं आणि तसं झालं तर युजर्सची पर्सनल माहिती लीक होऊ शकते.
(हेही वाचा Sanatan Sanstha : दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा जयघोष !)
गुगलने आपल्या इंटर्नल रिपोर्टनुसार म्हटलं आहे की, टू स्टेप व्हेरिफिकेशन सेट करण्यासाठी ऍक्टिव्ह अकाऊंटच्या तुलनेने ऍक्टिव्ह नसलेल्या अकाऊंटची शक्यता दहा पट कमी झालेली असते. याचा अर्थ असा होतो की असे अकाऊंट सुरक्षित नसतात. अशा अकाऊंटचा हॅकर्स सायबर गुन्हे करण्यासाठी गैरवापर करू शकतात.
गुगलने ब्लॉगवर अशा गोष्टींची लिस्ट दिली आहे ज्या वापरून तुम्ही तुमचे अकाऊंट ऍक्टिव्ह आणि सुरक्षित ठेऊ शकता. त्यामुळे अकाऊंट बंद होण्यापासून वाचायचं असेल तर आजच गुगलच्या नियमावलीनुसार कृती करा आणि सुरक्षित रहा.
Join Our WhatsApp Community