महाराष्ट्रातील बऱ्याच भागत येणाऱ्या काही दिवसांत वातावरण चांगलेच तापणार आहे. विदर्भ, मराठवड्यातील तापमान ४१ अंश सेल्सियसच्या पार जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 21 मे रोजी 41 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अकोल्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
देशातही तेच वारे
देशाच्या अनेक राज्यांतील तापमान चाळीशी पार करणार आहे. यात हरियाणा, पंजबा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडीशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कनार्टक, तामिळनाडू, तेलगंणामधील तापमान 42 च्या घरात जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागलॅंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा Azad Maidan Riot : धर्मांध मुसलमान आरोपी मोकाट, पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत!)
म्हणून हे करावं लागेल
बदलत्या जीवनशैलीमुळे आधीच नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. उकाड्याने सर्वांना हैराण करून सोडले आहे. जर वेळीच योग्य काळजी घेतली नाही तर उष्माघाताशी संबंधित त्रास वाढू शकतात. गेल्या काही काळात अनेकांनी उष्माघातामुळे प्राण गमावला आहे. उन्हाळ्यात सर्वांनी किमान अडीज ते तीन लीटर पाणी प्यायला हवे. पुरेसे पाणी प्यायले नाही तर हीट स्ट्रोकचा धोका वाढेल.
Join Our WhatsApp Community