राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडी अधिकाऱ्यांकडून तब्बल नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळेस शेजारील राष्ट्रवादीच्या पक्षकार्यालयात एकही राष्ट्रवादीचा वरिष्ठ नेता नव्हता. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यापैकी कोणीही सोमवारी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात नव्हते. फक्त जितेंद्र आव्हाड दिवसभर जयंत पाटलांसोबत होते. तेव्हापासून ईडीच्या लढाईत जयंत पाटील एकाकी पडल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच आता ईडीच्या चौकशीनंतर सगळ्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी फोन करून विचारपूस केली पण अजित पवारांनी एकही फोन केला नसल्याचे स्पष्टपणे जयंत पाटलांनी सांगितले. यावरून आता जयंत पाटील एकाकी पडल्याची चर्चा आणखीन होत आहे.
मंगळवाी शरद पवारांना भेटायला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख नेत्यांनी फोन केले. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी फोन केले. पण अजित पवारांचा फोन आला का? असा प्रश्न विचारताच जयंत पाटील म्हणाले नाही, त्यांचा फोन आला नाही. पण दुसऱ्याबाजूला सोमवारी जयंत पाटलांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांची बाजू सावरुन धरली आणि म्हणाले की, प्रमुख नेत्यांची स्वतःची काही काम असतात. ते पक्ष कार्यात गुंतले असतात. अशाप्रकारे पक्ष कार्यात गुंतलेल्या सगळ्यांनी आपलं काम सोडून मुंबईत यावं. आणि सगळ्यांना माहित आहे, जयंत पाटील स्वच्छ आहेत. ते चौकशी झाल्यानंतर परत बाहेर येणार. याची खात्री असल्यामुळे आणि माझ्यावर विश्वास असल्यामुळे ते उपस्थित राहिले नाही.
दरम्यान जयंत पाटील मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी गेले आहेत. या भेटीत ईडीच्या चौकशीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community