इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) प्रकरणी सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी झाली. या चौकशीला जाण्याआधी व चौकशी पूर्ण होऊन परत येईपर्यंत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ वगळता कोणीच बडे नेते सोबत दिसले नाहीत. मुंबईतील ईडीचे कार्यालय हे तसे पाहता राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. काही निवडक पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडले तर जयंत पाटील यांच्यासाठी कोणीच मोठे आंदोलन करताना दिसले नाही.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे साधे ट्विट देखील नाही…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तशी बड्या नेत्यांची काही कमी नाही. एखादे आंदोलन करायचे म्हटले तर नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. परंतु जयंत पाटलांच्या ईडी चौकशी आधी किंवा नंतर कोणत्याही बड्या नेत्याचे साधे ट्विट देखील दिसून आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर झालेल्या आंदोलनात जितेंद्र आव्हाड भुजबळ वगळता ही बडा नेता पाटलांच्या समर्थनार्थ दिसून आला नाही.
(हेही वाचा – नऊ तासांच्या ईडी चौकशीनंतर सगळ्या प्रमुख नेत्यांचा फोन, पण अजित पवारांना नाही; जयंत पाटील एकाकी पडल्याच्या चर्चांणा उधाण)
मला अजित पवारांचा फोन आला नाही…
साडेनऊ तास चौकशी झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन मला पक्षातीलच नव्हे तर महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांचे फोन आल्या संदर्भात सांगितले. परंतु आज सकाळी माध्यमांनी त्यांना शरद पवार यांची भेट घेण्याआधी विचारणा केली असता मला अजित पवार यांचा कोणताही फोन आला नसल्याचे सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community