झारखंड राज्यातल्या रांची जिल्ह्यात एक विशेष घटना घडली आहे. राज्यातल्या एका महिलेने एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिल्याची आर्श्चकारक घटना घडली आहे.
२२ मे २०२३ रोजी रांचीतल्या रिम्स रुग्णालयात एका महिलेने पाच बालकांना जन्म दिला आहे. त्यांच्या जन्मानंतर ही बातमी रुग्णालयात, राज्यात आणि देशात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यांच्या जन्माचे सर्वांनाच राहून राहून आश्चर्य वाटते आहे.
आनंदाला चिंतेची किनार
सोमवारी (२२ मे २०२३) जन्माला आलेल्या या बालकांचे आरोग्य सध्या तरी चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. सामान्यपणे जन्माला आलेल्या नवजात शिशुचे वजन अडीच ते साडे चार किलोच्या दरम्यान असते. जर त्या पेक्षा कमी वजन असेल तर बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. रांचीच्या या बालकांचे वजन ७५० ग्रॅम ते १ किलोच्या दरम्यान आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस बालकांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. बालकांची जन्मदात्री मलकपूर गावाची निवासी आहे. अनिता कुमारी असे बालकांच्या आईचे नाव आहे.
(हेही वाचा – Biggest Cake : पुण्याच्या केक-आर्टिस्टने केला जागतिक विक्रम; तयार केला २०० किलो महाल-केक)
डॉक्टर म्हणाले…
अर्भक साधारणपणे ३८ ते ४० आठवडे आईच्या गर्भात राहते. मात्र या बालकांनी अवघ्या २६-२७ आठवड्यात जन्म घेतला आहे. आईचे आरोग्य स्थिर असले तरीही बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community