Road Accident : १० वर्षांत राज्यामधील रस्ते अपघातातील मृतांची संख्या थक्क करणारी

जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ या चार महिन्याच्या कालावधीत राज्यात ४,५३० प्राणांतिक अपघातात ४,९२२ जणांना जीव गमवावा लागला तर, ६,८४५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

192

राज्यात मागील दहा वर्षांत रस्ते अपघातात १ लाख ३५ हजार ५३५ जणांना आपला जीव गमवावा लागला असून जवळपास २ लाख जण अपघातात गंभीर झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी राज्य महामार्ग पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केली आहे. राज्यात दरवर्षी अपघातात मृत्यूची संख्या जवळपास १२ ते १५ हजार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. राज्य महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार सर्वात अधिक अपघात कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि नाशिक या चार जिल्ह्यांत झाले आहेत.

राज्यात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या संख्येत भयंकर वाढ झाली आहे. या अपघातात मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ या चार महिन्याच्या कालावधीत राज्यात ४,५३० प्राणांतिक अपघातात ४,९२२ जणांना जीव गमवावा लागला तर, ६,८४५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

(हेही वाचा MHADA Lottery Mumbai: म्हाडा सोडतीला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद)

सोमवारी रात्रीपासून दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत मुंबई-नागपूर महामार्ग, रायगड, खोपोली आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत झालेल्या भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे १५ जखमी झाले आहे. राज्य महामार्ग पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात सर्वाधिक अपघात हे रात्री १२ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान होत असतात. राज्य महामार्ग पोलिसांच्या पत्रकात सर्वाधिक अपघाताचे ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अपघात होत आहे, त्याला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जात आहे. राष्ट्रीय महार्गावर ६१०, राज्य महामार्गावर २०२, महत्वाच्या रस्त्यावर ४, मुंबई पुणे महामार्गावर १० आणि इतर १७८ असे एकूण राज्यात १००४ ब्लॅक स्पॉट असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या ठिकाणी सर्वाधिक अपघात होत असून मृत्यूची संख्या देखील मोठी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.