मागील सहा महिन्यांपासून बढतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षा अखेर सोमवारी संपली,गृहविभागाने राज्यातील १४३पोलीस निरीक्षकाच्या बढतीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले आहे. त्याच बरोबर बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्या तील १३९ सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहे.
राज्य पोलीस दलातील निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या २०० पेक्षा अधिक अधिकारी मागील काही वर्षांपासून बढतीच्या प्रतीक्षेत होते, दरम्यान नोव्हेंबर २०२२ मध्ये पोलीस महासंचालक कार्यालया कडून पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या १७५ अधिकारी यांच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या बढतीची यादी जाहीर करून ती यादी गृहविभागाकडे पाठविण्यात आली होती.
नोव्हेंबर २०२२ पासून बढतीच्या प्रतीक्षेत असणारे अनेक अधिकारी बढती विनाच सेवानिवृत्त झाले आहे. अखेर तब्बल ६ महिन्यानंतर गृहविभागाला पोलीस निरीक्षकाच्या बढतीचा मुहूर्त मिळून आला. गृहविभागाकडून सोमवारी सायंकाळी १४३ निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर असणाऱ्या अधिकारी यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या बढतीचे आदेश काढण्यात आले आहे. राज्यातील निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर असणाऱ्या १४३ अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. तसेच राज्य भरातील १३९ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या विविध जिल्ह्यामध्ये बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
Join Our WhatsApp Community