प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे आज पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना गुणवत्तेनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार असल्याचा पुनरुच्चार केला. प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप निश्चित केले जाईल, असे पटोले यांनी सांगितले.
Congress : काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत मविआतील जागा वाटपावर झाली चर्चा
मागील तीन वर्षात आम्ही सर्व निवडणुकांमध्ये भाजपला मागे टाकत विजय मोठा संपादन केला आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. तथापि, २०१४, २०१९ आणि आत्ताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे येत्या २ आणि ३ जूनला काँग्रेस पक्ष प्रत्येक जागेचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे सांगितले. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. विदर्भात काँग्रेसचा जनाधार वाढलेला आहे. मागील तीन वर्षात आम्ही सर्व निवडणुकांमध्ये भाजपला मागे टाकत विजय मोठा संपादन केला आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community