बहुचर्चित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल ११ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. तेव्हापासून १६ आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची डांगती तलवार आहे. १६ आमदार पात्र की अपात्र यांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. पण तत्पूर्वी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊच देणार नाहीत. महाविकास आघाडी तुटेल आणि उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येतील. यामुळे कोणताही आमदार अपात्र होणार नाही, असा दावा काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केला.
नक्की काय म्हणाले आशिष देशमुख?
‘जर आमदार अपात्र ठरले तर पुढील सहा वर्षांसाठी त्यांच्यावर ही अपात्रता लागू होणार आहे. या निर्णयामुळे अनेकजण राजकारणातून बाद होण्याचा धोका आहे. कोणताही राजकीय नेता आपल्या आमदारांना अशाप्रकारे अपात्र होताना पाहू शकत नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट आगामी काळात एकत्र येतील. आणि जर ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर कोणताही आमदार अपात्र होणार नाही. आता दोन्ही नेत्यांकडे हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे मविआत सुरू असलेल्या वाटाघाटीला काहीच अर्थ नाही. लवकरच दोन्ही नेते एकत्र येऊन शिवसेना भाजपसोबत जाईल,’ असे आशिष देशमुख प्रसार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community