Karnataka : कर्नाटकमध्ये दिसतायेत काँग्रेसच्या घोषणेचे साईडइफेक्ट; मीटर रिडींग करायला आलेल्या वीज विभागाच्या अधिकाऱ्याला चोपले

काँग्रेसने सत्तेत आल्यास त्यांना मोफत वीज देऊ केली असल्याने त्यांना बिल भरण्याची गरज नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

279

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसची राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे, परंतु पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी काही भागातील लोक आधीच करत आहेत. 200 युनिट मोफत वीज देण्याचे निवडणुकीतील काँग्रेसचे प्रमुख आश्वासन होते. आता त्याचे साईड इफेक्ट दिसू लागले आहेत. वीज विभागाचे अधिकारी गावोगावी जाऊन मीटर रीडिंग घेत असताना एका अधिकाऱ्याने चित्रदुर्गातील एका महिलेला बिल दिले, तेव्हा तिने बिल भरण्यास नकार दिला आणि काँग्रेसच्या आश्वासनाची आठवण करून दिली. एक गावात तर वीज विभागाच्या अधिकाऱ्याला वीज बिल भरायचे नाही म्हणून मारहाण करण्यात आली. हा मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

कोप्पल, कलबुर्गी आणि चित्रदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांतील गावांतील लोकांनी वीज बिल भरण्यास नकार दिला आहे. काँग्रेसने सत्तेत आल्यास त्यांना मोफत वीज देऊ केली असल्याने त्यांना बिल भरण्याची गरज नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. “सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना आमची बिले भरून द्यावीत. निवडणुकीनंतर लगेचच 200 मोफत युनिटची हमी लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे इथे येऊ नका. आम्ही बिल भरणार नाही. एकदा आम्ही मतदान करताना बटण दाबले की, आम्ही या हमींचे हक्कदार होतो, ”काँग्रेसचे मुख्यमंत्री-नियुक्त सिद्धरामय्या आणि राज्य पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचा संदर्भ देत महिलेने अधिकाऱ्याला सुनावले. आम्ही चालू बिल भरणार नाही. काहीही असो, आम्हाला 200 युनिट मोफत वीज देण्याचे वचन दिले आहे, असे कोप्पलमधील दुसर्‍या व्यक्तीने सांगितले.

(हेही वाचा Modi Cabinet : मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत; आगामी निवडणुका असलेल्या राज्यांना प्राधान्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.