मुस्लिम पक्षाने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात हिंदु पक्षाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आपला आक्षेप नोंदवला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला ज्ञानवापी मशिदीच्या संपूर्ण संकुलाचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली, त्यावर ज्ञानवापी मस्जिद समितीने म्हटले की, मुघल सम्राट औरंगजेब क्रूर नव्हता किंवा त्याने वाराणसीतील भगवान आदि विश्वेश्वर मंदिर नष्ट केले नाही, असा दावा न्यायालयात केला.
जुन्या भगवान आदि विश्वेश्वर मंदिरावर मुस्लिम आक्रमकांनी हल्ला केला आणि ते नष्ट केले. त्यानंतर 1580 मध्ये राजा तोंडल माळ यांनी या ठिकाणी पुन्हा मंदिर बांधले होते, असा दावा या प्रकरणी हिंदू पक्षाने केला. हा दावा खोडताना मशीद समिती मशीद समिती (अंजुमन इंतेजामिया मस्जिद समिती) ने उपरोक्त धक्कादायक दावा केला. गेल्या वर्षी न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी ज्ञानवापी मशीद संकुलात ‘शिवलिंग’ सापडल्याचेही म्हटले, तेही मशीद समितीने नाकारले. मस्जिद समितीने सांगितले की, ज्ञानवापी येथे एकही शिवलिंग सापडले नाही. तिथे पाण्याचा झरा आहे. या प्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी 7 जुलैपर्यंत स्थगित केली आहे.
Join Our WhatsApp Community