Trans harbour link road : मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक रोड नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार

या प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.

303

मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक रोड नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई ते मुख्य भूमीची प्रत्यक्ष जोडणी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून, जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-४५ वर चिले गावाजवळ आंतरबदल आहेत. प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे सांगण्यात आले.

प्रकल्पाचे फायदे

  • नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास
  • प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य
  • मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य
  • मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यांमधील अंतर सुमारे १५ किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत
  • मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार

(हेही वाचा Gyanvapi Case : ‘औरंगजेब क्रूरही नव्हता ना त्याने विश्वेश्वराचे मंदिर तोडले…’, मशीद समितीचा न्यायालयात दावा)

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • हा भारतातील सर्वात जास्त लांबोचा आणि जगभरातील १० थ्या लांबीचा पाण्यावरील समुद्रावरील पूल ठरणार आहे. ऑर्थोोट्रॉपीक स्टॉल डेफ पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर करण्यात आला आहे.
  • सुमारे ५०० बोईंग ७४७ विमानांच्या वजनाइतका म्हणजेच सुमारे ८५००० मे.टन ऑर्थोट्रॉपीक स्टोलचा प्रकल्पात वापर. सुमारे १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजेच सुमारे १,७०,००० मे. टन वजनाच्या स्टीलच्या सळयांचा प्रकल्पात वापर
  • पृथ्वीच्या व्यासाच्या ४ पट म्हणजेच सुमारे ४८,००० किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसोग वायर्सचा प्रकल्पात वापर. स्टैचू ऑफ लिबटींच्या पुतळयाकरीता वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच सुमारे १,७५,००० धनमीटर काँक्रीटचा प्रकल्पात वापर
  • बुर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीच्या म्हणजेच सुमारे ३५ किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर

किती काम पूर्ण झाले?

सद्यःस्थितीत प्रकल्पाच्या स्थापत्य कामांची सर्वसाधारण भौतिक प्रगती इतकी ९४६ असून प्रकल्पाची सर्वसाधारण आर्थिक प्रगती ९३ टक्के इतकी आहे. प्राधिकरणामार्फत प्रकल्प राबविताना प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले असून प्रकल्पबाधित मच्छिमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे. व देण्यात येतही आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.